‘भूल भुलैया ३’ च्या सेटवरून फोटो आले समोर; माधुरी, तृप्ती, विद्या बालन हॉट अभिनेत्री एकत्रित

‘भूल भुलैया ३’ च्या सेटवरून फोटो आले समोर; माधुरी, तृप्ती, विद्या बालन हॉट अभिनेत्री एकत्रित

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'भूल भुलैया' आणि अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया २' हे दोन्ही चित्रपट खूपच गाजले. 'भूल भुलैया' म्हटलं की, पिवळ्या कपड्यातील अक्षय कुमार आणि काळ्या कपड्यातल्या कार्तिक आर्यनची प्रतिमा डोळ्यांसमोर रेगांळते. आता चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की, 'भूल भुलैया ३' येत आहे. या चित्रपटाच्या सेटवरून नुकतेच धमाकेदार स्टार्संचे फोटो समोर आले आहेत.

तृप्ती डिमरीविषयी हेही माहिती आहे काय?

  • तृप्ती डिमरीने कॉमेडी चित्रपट 'पोस्टर बॉईज'मधून अभिनयात पदार्पण केले.
  • रोमँटिक चित्रपट 'लैला मजनू'मध्ये तिची पहिली मुख्य भूमिका होती.
  • 'बुलबुल' चित्रपटा साठी तिला फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार मिळाला.

स्टार्संचा लूक व्हायरल

नुकतेच दिग्दर्शक अनीस बज्मी यांचा 'भूल भुलैया ३' च्या सेटवरून काही कलाकारांचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, विद्या बालन, तृप्ती डिमरी यांच्या लूक जोरदार चर्चा रंगली आहे. माधुरी दीक्षित, विद्या बालन या दोघीजणी ब्लॅक रंगाच्या साडीत दिसल्या आहेत. तर तृप्ती डिमरी रेड कलरच्या साडीत बंगाली लुकमध्ये दिसली. याशिवाय कार्तिकही ब्लॅक रंगाचे वेशभूषेत आणि इतर काही स्टार्स लाला रंगाच्या वेशभूषेत दिसले आहेत.

हॉरर-कॉमेडी ड्रामा

'भूल भुलैया ३' हा एक हॉरर-कॉमेडी ड्रामा चित्रपट असून तो २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. अनीस बज्मी यांनी दिग्दर्शन करत आहेत. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया ३' हा चित्रपट येत असल्याने चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मनीष वाधवा आणि राजेश शर्मा यांचा लूक व्हायरल

दरम्यान मनीष वाधवा आणि 'क्रू' चित्रपटात मित्तल साहेबांची भूमिका साकारणारा राजेश शर्माचा लूकही दिसत आहे. राजेश शर्मा यांनी धोती आणि कुर्ता परिधान केला आहे. मात्र, याधीच्या चित्रपटातील अभिनेता राजपाल यादव आणि संजय मिश्रासारख्या कलाकारांचा लूक दिसला नाही. यामुळे या स्टार्संची या चित्रपटात भूमिका आहेत की नाही ही माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news