Congress star campaigners : काँग्रेस स्‍टार प्रचारक यादीत सोनिया, राहुल यांच्‍यासह मनमोहनसिंगही | पुढारी

Congress star campaigners : काँग्रेस स्‍टार प्रचारक यादीत सोनिया, राहुल यांच्‍यासह मनमोहनसिंगही

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचाराने आता चांगलीच गती घेतली आहे. राज्‍यात पहिल्‍या टप्‍प्‍यासाठी १० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. रविवारीच समाजवादी पार्टीने आपली स्‍टार प्रचारक ( Congress star campaigners ) यादी जाहीर केली होती. यानंतर आज काँग्रेस पक्षाने आपले स्‍टार प्रचारक जाहीर केले आहेत. या यादीत पक्षाच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्‍यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्‍या नावाचा समावेश आहे.

काँग्रेसच्‍या स्‍टार प्रचारक यादीत ( Congress star campaigners ) अध्‍यक्ष सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्‍या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्‍यमंत्री भूपेश बघेल, सचिन पायलट यांच्‍या नावांचा समावेश आहे.

काँग्रेस पक्षाच्‍या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्‍ये मागील काही दिवसांपासून प्रचारास प्रारंभ केला आहे. ४० टक्‍के उमेदवारी ही महिलांना देणार असल्‍याचेही त्‍यांनी जाहीर केले आहे. तसेच काँग्रेस उत्तर प्रदेशमध्‍ये स्‍वबळावर निवडणूक लढवत आहे. “आम्‍ही मागील काही वर्ष उत्तर प्रदेशमध्‍ये अनेक जागांवर निवडणूक लढवलीच नव्‍हती. ४०० पैकी केवळ १०० किंवा २०० मतदारसंघांमध्‍येच निवडणूक लढवली तर अन्‍य जागांवरही त्‍याचा परिणाम होत असतो. त्‍यामुळेच आम्‍ही स्‍वबळाचा नारा देत पक्षाला अधिक मजबूत करण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहोत” असे प्रियांका गांधी यांनी नुकतेच एका मुलाखतीमध्‍ये स्‍पष्‍ट केले होते.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ :

 

Back to top button