यवतमाळ : रेती घाटावर तुंबळ हाणामारी; हवेत गोळीबार, अनेक जण जखमी | पुढारी

यवतमाळ : रेती घाटावर तुंबळ हाणामारी; हवेत गोळीबार, अनेक जण जखमी

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : वर्चस्ववादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात अनेक जण जखमी झाले असून हवेत गोळीबार झाल्यामुळे परिसर हादरला आहे. महागाव तालुक्यातील भोसा रेती घाटावर गुरुवारी (दि.२८) मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळावरून चार राउंड रिकामे, तर दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीसह २० ते २५ आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहे. आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

मुख्य आरोपी अंजुम लाला यांनी फिर्यादीला घटनास्थळावर दमदाटी करून मारहाण केली व त्यांच्या दिशेने राउंड फायर केल्याची तक्रार सुरेश ऊर्फ कृष्णा ढाले यांनी महागाव पोलिसांत दाखल केली. या तक्रारीवरून अंजूम लाला व २० ते २५ जणांविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी पहाटे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. घटनास्थळावरून एक कार, सहा मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा :

Back to top button