नागपुरात तीळी चतुर्थीनिमित्त टेकडी गणेशाला 900 किलो रेवडीचा प्रसाद | पुढारी

नागपुरात तीळी चतुर्थीनिमित्त टेकडी गणेशाला 900 किलो रेवडीचा प्रसाद

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जानेवारीत येणाऱ्या तीळी चतुर्थीनिमित्ताने आज (दि. २९ सोमवारी) नागपुरातील श्री टेकडी गणेश मंदिरात सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

नागपूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेशाच्या दर्शनाला चतुर्थीनिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. आज भाविकांकडून 900 किलो रेवडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. आजच्या दिनी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने मंदिराला आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे. गर्दी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने हार,बेल,फुले,प्रसाद आणू नका असे आवाहन भाविकांना करण्यात आले. आणलेले हार,फुले स्वयंसेवकांकडे सोपविण्याची व्यवस्था केली गेली. भाविकांच्या सुविधेसाठी सीसीटीव्ही, पादत्राणे,पार्किंग आदी सुविधा करण्यात आल्या असून विविध समित्यांचे पदाधिकारी मंदिराचे अध्यक्ष विकास लिमये,सचिव श्रीराम कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिवसभर परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा

Back to top button