कायद्याचे रक्षण करूनच नार्वेकरांचा निकाल : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

कायद्याचे रक्षण करूनच नार्वेकरांचा निकाल : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधान मंडळाचे नियम – परंपरांचे पालन करून व कायद्याचे रक्षण करूनच आमदार अपात्रतेवर निकाल देतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. शिंदे- नार्वेकरांची भेट ही नियमित प्रक्रिया असून त्याचा निकालाशी संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नागपूर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार अपात्रतेसंदर्भात निकालाच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले की, आपले गुन्हे, पाप आणि अपयश लपविण्यासाठी दुसऱ्याच्या माथी खापर फोडणे सर्वात सोपे असते. त्यामुळेच असा नॅरिटिव्ह सेट केला जातो. वस्तूस्थितीसह नियम व कायद्याची परंपरा राखली पाहिजे. आरोप – प्रत्यारोप करून मनाला जरी समाधान मिळत असले, तरी जनतेला सर्वच ठाऊक आहे. अखेर सत्य हे सत्यच आहे. निकाल हा कायद्यानुसारच येणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

आमदार अपात्रतेचा निकाल आणि पक्षप्रवेशाचा काहीच संबंध नाही. भाजपाचे काम वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. मोदी सरकारच्या मागील १० वर्षात झालेल्या कामाचे संपूर्ण मूल्यमापन जनता करीत आहे. चीन सारखा विरोधी देश देखील मोदींच्या कामाची प्रशंसा करीत आहे. जगाचा विश्वास मोदींवर आहे. कुणी काही म्हणाले तरी काहीच फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button