Vijay Wadettiwar: ‘त्या’ ९ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढावेच लागेल: विजय वडेट्टीवार | पुढारी

Vijay Wadettiwar: 'त्या' ९ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढावेच लागेल: विजय वडेट्टीवार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापुरातील संताजी घोरपडे कारखान्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविषयी छेडले असता पुढील 15 दिवसांत मंत्रिमंडळातील 9 मंत्र्यांना काढावेच लागेल, त्यांचा राजीनामा घ्यावा लागेल. त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यांचे नाव आता सांगू शकत नाही. मात्र, मंत्रिमंडळ फेररचनेनंतर हे मंत्री दिसणार नाहीत. हे घोटाळेबाज सरकार आहे. भ्रष्टाचारी 9 मंत्र्यांना काढावेच लागेल. भ्रष्टाचारी मंत्र्यांना बाहेर काढल्याशिवाय पर्यायच नाही. त्यांच्याबाबत भाजपच्याच नेत्यांनी तक्रारी अगोदरच केल्या आहेत. सरकारने कारवाई केली नाही, तर आम्ही सत्य जनतेसमोर आणू, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)  यांनी दिला. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या हसन मुश्रीफ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी आमची मागणी आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातील बैठकी संदर्भात छेडले असता इंडिया आघाडीसंदर्भात दिल्लीत अतिशय सकारात्मक बैठक झाली. जागा वाटपाबाबत आम्ही पुढे जातोय. आमदार अपात्रता बाबत बोलताना 16 आमदारांवर कारवाई होणारच. त्यामुळेच उशीर होतोय. वेळकाढूपणा होतोय. नांदेड रुग्णालयाचा दोष नाहीच, सरकारचा दोष आहे. त्या नालायक मंत्र्यांनी निधीच दिला नाही. (Vijay Wadettiwar)

दोष सरकारचा आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण या दोन्ही खात्यांची जबाबदारी आहे, ती झटकून चालणार नाही. बावनकुळे कधी शिंदे, कधी पवार कधी फडणवीस यांचे मु्ख्यमंत्री म्हणून नाव घेतात, त्यांना सगळ्यांनाच खूश ठेवायचे आहे. अजित पवार यांची राजी नाराजी हा दबावाचा खेळ असून, तो राजकीय आजार होता, असे टीकास्त्र सोडले.

आशियाई गेम्समध्ये नागपूरच्या ओजस देवतळे याने पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड या प्रकारात अंतिम सामना खेळत गोल्ड मेडल जिंकले आहे. ओजसने आशियाई गेम्समध्ये तीन गोल्ड मेडल मिळवत इतिहास घडवला आहे. याबाबत ते म्हणाले की, ओजस देवतळे या नागपूरकर विदर्भाच्या सुपुत्राने मानाचा तुरा रोवलाय. हे खूपच अभिमानास्पद आहे, अशी प्रतिक्रिया  वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा  

Back to top button