चंद्रपूर : चिमुकल्‍यांच्‍या जीवाशी खेळ, चक्‍क ट्रॅक्टरमधून शैक्षणिक सहल..!, अपघातानंतर प्रकार उघड | पुढारी

चंद्रपूर : चिमुकल्‍यांच्‍या जीवाशी खेळ, चक्‍क ट्रॅक्टरमधून शैक्षणिक सहल..!, अपघातानंतर प्रकार उघड

चंद्रपूर पुढारी वृत्तसेवा : मूल पंचायत समिती अंतर्गत मोरवाही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सहल घेवून
जाणा-या ट्रक्टरला सोमवारी (दि.५) मूल ते चिखली मार्गावर अपघात झाला. या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्‍यांना प्राथमिक उपचारांसाठी  मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्याध्यापकांनी या सहलीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे.  त्‍यांच्‍या कार्यशैलीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ट्रॅक्टरमधून शैक्षणिक सहल..

माहितीनुसार, मोरवाही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. मूल तालुक्यातील चिखली गावापासून जवळच असलेल्या मारुती मंदिर असलेल्या कन्हाळगाव येथे सोमवारी (दि.५) शैक्षणिक सहल नेण्याचे नियोजन करण्यात आले होते. या सहलीसाठी मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणा-या  दोन ट्रॅक्टर ठरवले गेले.शाळेतील सुमारे साठ विद्यार्थी आणि शिक्षक सहलीसाठी जात होते.

ट्रॅक्टरया ट्रालीला अपघात

मोरवाही ते बेलघाटा येथे विद्यार्थ्यांनी भरलेली ट्रॅक्टरची ट्राली पलटी झाली. या अपघातामुळे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघातानंतर मूल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी म्हणाले,”मोरवाही येथील मुख्याध्यापकांनी सहलीसाठी कोणतीही परवानगी घेतली नाही. याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा 

Back to top button