

अकोला; पुढारी वृत्तसेवा : हेडफोनवरून वाद झाल्याने मामेभावाने आतेबहिणीचा खून केल्याचे समोर आले आहे.
राग कोणत्या थराला जाईल, काहीही सांगता येत नाही. त्याच रागातून अनेक आयुष्य उद्धवस्त झालेली आपण पाहिलेली आहेत.
असाच एक प्रकार अकोल्यात शनिवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आला.
हेडफोनवरून वाद झाल्याने म्हणून सख्या मामेभावाने आतेबहिणीची हत्या केल्याची घटना गौरक्षणरोडवरील माधव नगरात घडली.
नेहा नंदनलाल यादव असे मृत २० वर्षीय तरुणीचे नाव आहे. तर ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव असे मारेकरी भावाचे नाव आहे.
नेहा आणि ऋषिकेश या दोघांमध्ये हेडफोनवरुन वाद झाला. त्यातूनच नेहाचा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आरोपी बॉबी यादव हा मृतक नेहाचा मामेभाऊ असून सध्या त्याला खदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी.सी.खंडेराव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.