इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीर ठराव करुन इस्लामपूर नगरपालिका मालकीच्या हस्तांतरीत केलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याचा सत्ताधारी विकास आघाडीने केलेला ठराव जिल्हाधिकाऱ्यानी ग्राह्य धरला आहे. या ठरावाविरोधात विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कलम ३०८ खाली जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेले अपिल फेटाळण्यात आले आहे. याबाबतची माहिती इस्लामपूर नगरपालिका नगरसेवक वैभव पवार यांनी पत्रकार बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात झालेल्या बेकायदेशीर ठरावांवर शिक्कामोर्तब झाला.
अधिक वाचा :
वैभव पवार म्हणाले, राष्ट्रवादीची सत्ता असताना तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या मालकीच्या कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता बेकायदेशीर ठराव करुन नाममात्र भाडेतत्त्वावर हडप केल्या होत्या.
निनाईनगर व अंबिका उद्यान येथील व्यायामशाळा, बाजारमाळ येथील इमारत अशा मालमत्ता पुन्हा पालिकेच्या ताब्यात घेण्याचा ठराव सभागृहात करण्यात आला होता.
अधिक वाचा :
या ठरावाला विरोधी राष्ट्रवादीच्या नगसेवकांनी कलम ३०८ खाली जिल्हाधिकाऱ्यांकडे विरोध केला होता.
मात्र जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी हे अपिल फेटाळले आहे.
त्यामुळे लवकरच या मालमत्ता पालिका प्रशासन आपल्या ताब्यात घेईल.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातील बेकायदेशीर कारभारावर शिक्कामोर्तब झाला आहे.
अधिक वाचा :
तर नगराध्यक्ष निशिकांत पाटील व विकास आघाडीच्या पारदर्शक कारभाराचा विजय झाला असल्याची सांगण्यात आले.
अजित पाटील, विजय पवार आदी यावेळी उपस्थित होते.
हे ही वाचा :
हे ही पाहा :
[visual_portfolio id="7246"]