नस कापून आत्महत्या : निपाणीतील ट्रक चालकाने संपवले जीवन | पुढारी

नस कापून आत्महत्या : निपाणीतील ट्रक चालकाने संपवले जीवन

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : यमगर्णी येथील एका ट्रक चालकाने आत्महत्या केल्याचे उघड झाले. आपल्या उजव्या हाताची नस कापून घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. शेखर विराणा पद्मशाली (वय ५०) असे मृताचे नाव आहे.

शेखर हा मूळचा आंध्र प्रदेशातील रहिवासी आहे. शुक्रवारी यमगर्णी येथील विडी कॉलनी वसाहतीत हा प्रकार उघडकीस आला.

अधिक वाचा :

अधिक माहिती अशी की, गेल्या सहा महिन्यापासून लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्याने ट्रक चालक शेखर तणावाखाली होते. त्याचबरोबर त्याच्यावर कर्जाचा बोजा होता.

अखेर तणावाखाली आल्याने ट्रक चालक शेखरने आपल्या उजव्या हाताची नस कापून घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शेखर हा कोल्हापूर येथे ट्रक चालक म्हणून काम करीत होता. गेल्या दहा वर्षांपूर्वी त्यांनी यमगर्णी येथील बिडी कॉलनीत घर खरेदी केले होते.

त्यामुळे तो आपल्या पत्नीसह घरी राहत होता. शेखर याला फिटस तसेच पित्ताचा त्रास होता. शिवाय गेल्या काही दिवसापूर्वी त्याची ऍंन्जिओग्राफी झाली होती. त्यामुळे तो आजारी होता.

अधिक वाचा :

यात कोरोनामुळे सध्या महाराष्ट्रात लॉकडॉनचा कालावधी आहे. त्यामुळे त्याचे कामही थांबले होते. त्यामुळे घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरावयाचे या विवंचनेमध्ये शेखर हा मानसिक तणावाखाली होता.

चार दिवसापूर्वी त्यांची पत्नी वैशाली या आपल्या माहेरी कोल्हापूर येथे गेल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी रात्री शेखर याने चाकूने आपल्या उजव्या हाताची नस कापून घेतली.

यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान शुक्रवारी सकाळी १० वाजले तरी शेखर घरावर पडला नसल्याने शेजारी राहत असलेल्या मित्राने याची पाहणी केली असत, नेमका प्रकार लक्षात आला.

त्यानुसार याची माहिती माहेरी गेलेल्या शेखर यांच्या पत्नीसह पोलिसांना देण्यात आली.

त्यानुसार घटनास्थळी सीपीआय संगमेश शिवयोगी, बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षिका कृष्णवेनी गुर्लहोसुर, हवालदार एस. एम.सनदी,श्रीशेल मळी यांनी भेट देऊन पाहणी केली.

सायंकाळी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत मयत शेखर यांच्या पत्नी वैशाली यांनी रितसर फिर्याद दिली असून,पुढील तपास उपनिरीक्षिका गुर्लहोसुर या करीत आहेत.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button