शरद पवार, देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटींनी राजकारण तापले | पुढारी

शरद पवार, देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटींनी राजकारण तापले

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन:  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

अधिक वाचा : 

केंद्रात नव्याने निर्माण केलेले सहकार खाते, अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांच्याविरोधात आवळलेला ईडीचा फास सध्या चर्चेत आहे

महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयाला होत असलेला भाजपचा विरोध पाहता पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी केलेल्या चर्चेला महत्त्व असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

अधिक वाचा : 

तर केंद्रात सहकार खात्याचा कार्यभार गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्यासह नवनिर्वाचित मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.

पवार यांच्यापाठोपाठ फडणवीस यांनीही भेटीगाठींचे सत्र सुरू ठेवल्याने नेमके काय सुरू आहे यांचे अनेक अंदाज लावले जात आहेत.

अधिक वाचा :

पवार यांच्या निवासस्थानी वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल यांनी भेट घेतली. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचीही पवार यांनी भेट घेतली होती.

पावसाळी अधिवेशनाची रणनीती

१९ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उडालेला हाहाकार, कोसळलेली व्यापार आणि वित्त व्यवस्था, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा यावरून विरोधी पक्ष आक्रमक असून पंतप्रधान मोदी यांची कोंडी करण्याची रणनीती आखली जात आहे.

या पार्श्वभूमीवर पवार यांनी घेतलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाविकास आघाडीत कुरबुरी

सध्या राज्या महाविकास आघाडी सरकारमध्येही आलबेल नाही. एकीकडे भाजप महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करत असून ती धार दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आहेत.

त्यामुळे पवार यांच्या भेटीमागे अनेक अर्थ लावले जात आहेत. पवार यांनी दिल्लीला जाण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

अधिक वाचा :

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी दिल्लीला जाण्यआधी राष्ट्रवादीचे नेते आणि अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. भुजबळ आणि फडणवीस यांच्या राजकीय हाडवैर असूनही ही भेट झाल्याने चर्चेला ऊत आला आहे.

अधिक वाचा : 

देवेंद्र फडणवीस : नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे सेना-राष्ट्रवादीला कापरं

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात सहकार कायद्यांबाबत चर्चा झाली. तसेच बँकावरील निर्बंधाबाबत चर्चा झाली असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्टीकरण दिले आहे. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चीनवरील सुरक्षेसंदर्भात चर्चा झाली असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

अधिक वाचा :

नरेंद्र मोदी यांचे सोशल इंजिनिअरिंग!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘सध्या राज्यात राजकीय परिवर्तन होईल अशी शक्यता नाही. फडणवीस यांची भेट ही सदिच्छा भेट होती. त्याचे राजकीय अर्थ लावून नयेत.’

हेही वाचलेत का: 

पहा  व्हिडिओ :  ७०  हजार जणांना बेघर करणारा पानशेत प्रलय

Back to top button