जळगाव : मोटर सायकल चोरी आणि घरफोडी करणाऱ्या एकाला अटक | पुढारी

जळगाव : मोटर सायकल चोरी आणि घरफोडी करणाऱ्या एकाला अटक

जळगाव; पुढारी ऑनलाईन : मोटर सायकल चोरी करून घरफोडी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी एलसीबी सापळा लावून जळगाव जिल्हातील माचला येथून पकडले. त्याच्याजवळ सापडलेली मोटरसायकल ही चोपडा येथील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

चोपडा तालुक्यातील माचला येथे सध्या राहत असलेला शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी (वय ३६, ता. अमळनेर, पाडसे) हा शहरात मोटर सायकल चोरी करुन घरफोडीसारखे गुन्हे करीत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती.

अधिक वाचा 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ, अनिल जाधव, अश्रफ शेख इंद्रीस पठाण, दिपक शिंदे, अशोक पाटील यांनी शान्या कोळी याला पकडण्यासाठी अमळनेर तालुक्यातील पाडसे व चोपडा तालुक्यातील मालचा येथे सापळा रचला.

अधिक वाचा 

पोलिसांनी शान्याला चोपडा तालुक्यातील मालचा येथून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळची मोटार सायकल हस्तगत केली आहे.

सदर मोटर सायकलची अधिक चौकशी केल्यावर ही मोटर सायकल चोपडा शहर पोलीस स्टेशन भाग -५, गुरन. २६४/२०२१ भादवि. क. ३७९ या गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय शान्याच्या चौकशीत त्याने अमळनेर व चोपडा तालुक्यात दारुचे तसेच किराणा दुकानामध्ये घरफोडी करुन चोरी केल्याचे उघडकीस आले.

अधिक वाचा 

शान्या कोळी याच्यावर अडावद, अमळनेर, चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपासासाठी शान्या प्रताप कोळी याला चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा : येरवड्याची भाषा करणाऱ्या यम भाईवर आली पस्तावण्याची वेळ

Back to top button