चाकण; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण भागात प्रेमप्रकरणातून वीटभट्टीवर काम करणाऱ्या २ तरूणांचा खून झाला आहे. तर संबधित मुलीवर देखील खुनी हल्ला करण्यात आला असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. सदर खून मुलीच्या कुटुंबातील व त्यांच्याशी संबंधित सहा जणांनी केला असल्याचा प्रकार शनिवारी (दि. १७) सकाळी चाकण जवळील करंजविहीरे येथे उघडकीस आला आहे.
हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांमध्ये प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक असलेल्या मुलीच्या वडिलांसह सहा जणांचा समावेश आहे. या घटनेमुळे खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा :
बाळू सिताराम गावडे (वय २६) व राहुल दत्तात्रय गावडे ( वय २८) अशी खून झालेल्या तरुणांची नावे आहेत.
या प्रकरणी करंजविहीरे येथील प्रसिद्ध 'माणुसकी' या हॉटेलचे मालक बाळू मरगज यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यांच्यासह अनिल संभाजी कडाळे, राजू साहेबराव गावडे, किरण बाळू मेंगाळ, चंद्रकरा उर्फ मुक्ता बाळू गावडे, आनंदा सीताराम जाधव (सर्व जण रा. करंजविहिरे ता. खेड) यांच्यासह सर्व ताब्यात घेतले आहे.
अधिक वाचा :
या बाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार करंजविहिरे येथे हॉटेल माणुसकी हे प्रसिद्ध हॉटेल आहे.
हॉटेल मालक बाळू मरगज यांच्या मालकीचे हे हॉटेल असून हॉटेलच्यासमोर मरगज यांचीच मोठी वीटभट्टी आहे.
वीटभट्टीवर काम करणारा कामगार बाळू सिताराम गावडे याने हॉटेल मालक यांच्या २१ वर्षीय मुलीला पळवून नेले होते.
त्यावेळी त्यांच्यासोबत याच वीटभट्टीवर काम करणारा राहुल दत्तात्रय गावडे हा देखील होता.
अधिक वाचा :
हॉटेल मालक बाळू मरगज यांनी मुलगी व पळून नेणारे बाळू, राहुल व मुलगी यांना पकडून आणून हॉटेल माणुसकी या ठिकाणी लाकडी काठी, लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केली, यात बाळू व राहुल मयत झाले आहेत.
तर मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
करंजविहिरे येथील घटनास्थळी चाकण पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेत ठार झालेले वीटभट्टीवर काम करणारे दोघेही तरुण आदिवासी ठाकर समाजातील असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी पोलिस पोहचले असून पंचनामा सुरु आहे.
हे ही वाचा :