धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेश एटीएसने नागपुरातून तिघांना केली अटक | पुढारी

धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेश एटीएसने नागपुरातून तिघांना केली अटक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत उत्तर प्रदेश येथील गोमती नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी आज ( दि. १७ ) मध्यरात्री नागपुरातील गणेश पेठ परिसरातून तीन जणांना अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मात्र ही अटक कोणत्या आरोपावरून करण्यात आली याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. एक महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने धर्मांतर रॅकेट उघडकीस आणले होते. त्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज मध्यरात्री नागपूर शहरातील गणेशपेठ भागातून या तीन जणांना ताब्यात घेतले.

अधिक वाचा :

मध्यरात्री केली कारवाई 

उत्तर प्रदेश पोलीसांना हवा असलेला प्रसाद नामक संशयीत हा दोन साथीदारांसह नागपुरातील घरी दडून बसल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली. मध्यरात्री एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने राहुल कॉम्प्लेक्समधील फ्लॅट क्रमांक २०२ मध्ये छापा टाकला.

एटीएसच्या पथकाने प्रसाद, कौसर व मानकरला अटक केली. मध्यरात्रीच एटीएसचे पथक तिघांना घेऊन लखनौकडे रवाना झाले.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद, कौसर आलम, आणि मानकर अशी अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.

प्रसाद हा नागपूरचा रहिवासी असून कौसर आलम हा झारखंडच्या धनबादच्या समोर लोहिचारा बारा, शिंगारी रोड येथील रहिवासी आहे.

मानकर हा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तहसीलमधील वायगाव येथील रहिवासी आहे.

अधिक वाचा :

यूपी एटीएसचा धर्मांतर रॅकेटचा भांडा फोड केल्याचा दावा

हे तिघेही जण गणेशपेठ पोलिस स्टेशनच्या अखत्यारीत हंसापुरी येथील डिलक्स कॉम्प्लेक्समध्ये राहत होते. यूपी एटीएसने गेल्या महिन्यात काही लोकांना अटक केली होती. त्यावेळी दावा केला होता की देशभरात धर्मांतराच्या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे.

आरोपींवर उत्तरप्रदेशने बंदी घालून बेकायदेशीर धर्मांतरण धर्म कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यूपी पोलिसांनी त्यावेळी पत्रकारांना सांगितले की, त्यांनी आरोपींकडील रजिस्टर जप्त केले आहे.

या रजिस्टरमध्ये १,००० हून अधिक लोकांची नावे आहेत.

याचबरोबर महाराष्ट्रातील केरळ, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली येथील लोकांची नावे व पत्ते नोंदवले गेले आहेत. या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश पोलिसांनी देशभर विविध ठिकाणी ही कारवाई सुरू केली आहे.’

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : मधमाशांनी बनवले दयावानचे आयुष्य मधाळ 

Back to top button