शरद पवार सहकार क्षेत्राच्या विषयावरून मोदींना भेटले : जयंत पाटील | पुढारी

शरद पवार सहकार क्षेत्राच्या विषयावरून मोदींना भेटले : जयंत पाटील

सोलापूर; पुढारी ऑनलाईन : खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज दिल्लीत भेट घेतली. या भेटीवरुन राजकीय वर्तृळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापुरात बोलताना खुलासा केला.

जयंत पाटील यांनी सोलापुरातील राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवर भाष्य केले. त्यांनी शरद  पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसेल्याचे सांगत राजकीय चर्चांना पूर्णविराम लावला.

अधिक वाचा :

शरद पवार या कारणासाठी दिल्लीत

जयंत पाटील यांनी ‘राज्यातील तसेच देशातील सहकारी बँका, पतसंस्था यामार्फत गरजू मध्यमवर्गाला आणि शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करण्यात येतो. या संस्थेवर नाबार्ड बँकेचे नियंत्रण होते. पण, आता रिझर्व्ह बँकेकडून अजून कडक निर्बंध घालण्यात येत आहेत. त्यामुळे सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत.’ अशी माहिती दिली.

ते पुढे म्हणाले की, ‘पवार साहेबांकडे याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती. त्यानुसार त्यांची ही ठरलेली भेट दिल्लीत झाली.’

अधिक वाचा :

शरद पवार साहेब जाताना मला सांगून गेले…

सहकार संस्थांकडून शरद पवार यांच्याकडे विविध तक्रारी व निवेदने आली होती. ‘रिझर्व्ह बँकेचे सहकारी वित्तीय संस्थांवरील निर्बंध कशा पध्दतीने कमी करता येतील याबाबत पवार यांनी मोदी यांच्यासोबत चर्चा केली आहे.

‘अन्य कोणत्या राजकीय विषयावर चर्चा झाली असेल तर ते मला माहिती नाही. कारण पवार साहेबांनी जाताना मला सहकाराचा विषय आहे असे सांगितले होते.’ असे जयंत पवार यांनी पत्रकारांना सांगितले.

ईडी चंद्रकांत पाटलांच्या ईशाऱ्यावर चालते

या पत्रकार परिषदेवेळी जयंत पाटील यांनी राज्यातील विरोध पक्षावरही निशाना साधला. ते म्हणाले,

‘राज्यातील विरोधी पक्षातील चंद्रकांत पाटील आणि काही नेत्यांच्या सल्ल्याने ईडीचे काम चालते. विरोधी पक्षाचा राज्य सरकार पाडण्याचा डाव सातत्याने दिसून आले आहे. ही गोष्ट जनतेलाही समजली आहे. सत्तेसाठी ईडीचा वापर करणे अत्यंत दुर्दैवी आहे.’

हेही वाचले का?

पाहा फोटो : 

Back to top button