आदिवासी विकास विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक निलंबित | पुढारी

आदिवासी विकास विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक निलंबित

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली येथील आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांना  महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बन्सोड यांनी निलंबित केले आहे. त्यांच्यावर महामंडळाच्या वतीने करण्यात येणारी धान खरेदी आणि मिलींगमध्ये गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.

प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्यासंदर्भात आदिवासी विकास महामंडळाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याविषयीची चौकशी करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीने केलेल्या चौकशीत गजानन कोटलावर दोषी आढळून आले. वीज जोडणी नसलेल्या राईस मिल्सना भरडाईचे कंत्राट देणे, धानाची मिलिंग करणाऱ्या मिलर्सना बँक गॅरंटीपेक्षा जादा डीओ देणे, राष्ट्रीयीकृत बँकेऐवजी सहकारी बँकेची गॅरंटी घेऊन धान भरडाईस परवानगी देणे असे अनेक गैरप्रकार गजानन कोटलावार यांच्या कार्यकाळात आढळून आले. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बन्सोड यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button