ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन उद्या तिरुपतीत | पुढारी

ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन उद्या तिरुपतीत

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन ७ ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे होणार आहे. यासाठी नागपूरसह विदर्भातून मोठ्या संख्येने ओबीसी समाजबांधव रेल्वे, ट्रॅव्हल्स, खासगी वाहनांनी रवाना झाले आहेत.

या अधिवेशनात जातनिहाय जनगणना व्हावी, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावे, ओबीसी समाजावर लादण्यात आलेली क्रीमी लेयरची असंवैधानिक अट तात्काळ रद्द करण्यात यावी, मंडल आयोग, स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्या, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन सन्मानित करा, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करा, आदी मागण्यांवर सखोल चर्चा होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांचे हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व अन्य नेते उपस्थित राहतील. या अधिवेशनात एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, डॉ. परिणय फुके, अभिजीत वंजारी, डॉ.बबनराव तायवाडे, डॉ. अशोक जिवतोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button