‘येत्या काही वर्षात भारतातील सर्व रेल्वे विजेवर चालणार; PM मोदींच्या हस्ते ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटन | पुढारी

'येत्या काही वर्षात भारतातील सर्व रेल्वे विजेवर चालणार; PM मोदींच्या हस्ते ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. अमृत भारत स्थानक योजना ही पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टीकोनावर आधारित असलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत 508 रेल्वे स्थानकांचा 24,470 कोटी खर्च करून हा पुनर्विकास केला जाणार आहे.

यावेळी नरेंद्र मोदी म्‍हणाले, आज संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर आहे. जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. यामागे दोन प्रमुख कारणे आहेत,  भारतात जवळपास 30 वर्षांनी पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर पूर्ण बहुमताच्या सरकारने मोठे निर्णय घेतले आणि आव्हानांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सतत काम केले.

तसेच, 25 हजार कोटी खर्च करून रेल्‍वे स्‍थानकांचा पूनर्विकास करण्यात येणार आहे. अनेक देशांच्या तुलनेत भारतातील रेल्‍वेचे नेटवर्क वाढेल आणि याचा फायदा सर्व राज्‍यांना होणार आहे, असे नरेंद्र मोदी म्‍हणाले. सर्व रेल्‍वे स्‍थानकांवर मोफत वायफाय देण्यात येणार आहे, याचा मोठया प्रमाणात युवकांना फायदा होईल. आपण गेल्‍या 9 वर्षात रेल्‍वेत मोठया प्रमाणात पैसे खर्च केले आहे. 2014 च्या तुलनेत 5 पटीने वाढ केली आहे.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, रेल्‍वे स्‍थानकावरील पायाभूत सुविधा वाढवल्‍या जाणार आहे. देशात रेल्‍वेचे जाळे वेगाने वाढत आहे. रेल्‍वेमध्ये ‘एक देश एक योजना’ सुरू करण्यात येणार आहे. इंजिन उत्‍पादनात 2014 तुलनेत 9 पटीने वाढ झाली आहे. पुढील काही वर्षात भारतातील सर्व रेल्‍वे विजेवर चालतील. याचा पर्यावरणाला मोठा फायदा होईल, असे नरेंद्र मोदी म्‍हणाले.

अमृत भारत स्थानक योजना ही पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टीकोनावर आधारित असलेली योजना सुरू केली आहे. या योजनेत पंतप्रधान मोदी यांच्या हस्‍ते 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांची होणार आहे. 24,470 कोटी खर्च करून हा पुनर्विकास केला जाणार आहे.
पुनर्विकास प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश

अमृत भारत स्थानक योजनेअर्तंगत महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री अश्विन वैष्‍णव, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश तसेच केंद्रीय मंत्री, खासदार, राज्याचे मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Back to top button