वर्धा : अंत्यविधीकरिता पैसे नसल्याने घरातच पुरला मुलीचा मृतदेह | पुढारी

वर्धा : अंत्यविधीकरिता पैसे नसल्याने घरातच पुरला मुलीचा मृतदेह

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : अंत्यविधीकरिता पैसे नसल्याने घरातच मुलीचा मृतदेह पुरल्याची घटना सेवाग्रामच्या आदर्शनगरात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. आठ दिवसांनी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी नोंद केली.

प्रवीणा साहेबराव भस्मे (वय ३८) रा. आदर्शनगर, सेवाग्राम असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून ती आजारी होती. ३ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. तसेच शेजार्‍यांशी फारसा संपर्क नसल्याने अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. अंत्यविधीकरीता पैसे नसल्याने भाऊ आणि वडिलांनी तिचा मृतदेह घरातच पुरला. सेवाग्राम पोलिसांना याबाबत गोपनिय माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तापस सुरू केला. पोलिस तसेच प्रशासनातील अधिकार्‍यांच्या उपस्थितीत खोदकाम करून मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदन करण्यात आले. तहसीलदार यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी पोलीस अधिकार्‍यांनी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी नोंद केली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button