ब्रिटनमध्ये बनवला कृत्रिम मंगळ! | पुढारी

ब्रिटनमध्ये बनवला कृत्रिम मंगळ!

लंडन : आपल्या पृथ्वीचा शेजारचा ग्रह म्हणजे मंगळ. एकेकाळी मंगळावर वाहते पाणीही होते हे आता सिद्ध झाले आहे. मंगळावर भविष्यात मानवी वसाहत होऊ शकते असे म्हटले जाते. त्याद़ृष्टीने मंगळाबाबतचे वेगवेगळे संशोधन सातत्याने सुरू असते. मंगळावर अंतराळवीर गेलेच तर त्यांना कोणत्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो हे पाहण्यासाठी पृथ्वीवरही मंगळासारखी स्थिती निर्माण करून वेगवेगळे प्रयोग केले जात असतात.

आता ब्रिटननेही पृथ्वीवरच असा मंगळ ग्रह बनवला आहे. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी एका शहरात मंगळ ग्रहाप्रमाणे वातावरण तयार केले आहे. ब्रिटनच्या आगामी महत्त्वाकांक्षी मंगळ मोहिमेसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. 2028 मध्ये ब्रिटनची मंगळ मोहीम पार पडणार आहे. त्यासाठी ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरच मंगळ ग्रहासारखे वातावरण तयार केले आहे.

ब्रिटन मंगळ ग्रहावर जाण्याची मोहीम आखत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे शास्त्रज्ञ स्टीवनेज यांनी मंगळ ग्रह निर्माण केला आहे. ब्रिटनने एका शहराला मंगळ ग्रह बनवले आहे. या शहरातील शेकडो एकर ब्रि जमिनीवर मंगळ ग्रहासारखे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या कृत्रिम मंगळ ग्रहावर शास्त्रज्ञांचे पथक संशोधन करत आहे. याला कृत्रिम मंगळ ग्रह असंही म्हणता येईल. ब्रिटनची अंतराळ संस्था मंगळ मोहीम आखत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी एका शहराचंच रुपांतर मंगळ ग्रहामध्ये केले आहे. तेथील लाल माती आणि इतर परिस्थितीप्रमाणे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केला आहे.

शास्त्रज्ञांनी रोव्हर तयार केला असून त्याचीही चाचणी या कृत्रिम मंगळ ग्रहावर करण्यात येणार आहे. फ्रेंच दिग्गज एरोस्पेस एअरबसने आपल्या एक्सोमार्स रोव्हरची चाचणी घेण्यासाठी हर्टफोर्डशायर शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये 22.5 दशलक्ष किमी अंतरावरील मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाप्रमाणे परिस्थिती तयार करण्यासाठी लाल वाळू आणि खडकांचा वापर केला आहे. ब्रिटनचे मंगळयान 2028 मध्ये जाणार आहे. या मोहिमेचा मूळ उद्देश मंगळ ग्रहावरील पाणी आणि जीवनाचे अस्तित्व शोधणे, हा असेल. एअरबसचे शास्त्रज्ञ स्टीवनेजमध्ये रोव्हर बनवले आहे. यामुळे यूके स्पेस क्षेत्रात 3500 लोकांना रोजगारही मिळाला आहे. कंपनी लवकरच युरोपियन स्पेस एजन्सीसोबत यासंबंधित करार करणार आहे.

Back to top button