Black Sesame : हृदय, मेंदूसाठी काळे तीळ ठरते गुणकारी | पुढारी

Black Sesame : हृदय, मेंदूसाठी काळे तीळ ठरते गुणकारी

निरोगी राहण्यासाठी लोक आरोग्यदायी आहाराचे पालन करतात. यासाठी आहारात फळे, भाज्या, नटस्, बिया इत्यादींचा समावेश करतात. काळे तीळ हे यापैकी एक आहे, जे खाल्ल्याने अनेक फायदे होतात. निरोगी चरबी, फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे (बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, व्हिटॅमिन ई) आणि कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, जस्त यांसारखे विविध पोषक घटक त्यांच्यामध्ये आढळतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. अर्थात तिळाचे सेवन, मग ते काळे असो किंवा पांढरे, हे उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात अधिक लाभदायक ठरते. काळ्या तिळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या…

मेंदूचे आरोग्य सुधारते :

काळ्या तिळामध्ये मॅग्नेशियम, लोह आणि जस्त यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. त्यांच्या सेवनाने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि एकूणच मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

पचन सुधारते :

काळ्या तिळात भरपूर फायबर असते. ते तुमची पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात. आहारात त्याचा समावेश केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि आतड्यांतील निरोगी मायक्रोबायोमला प्रोत्साहन मिळते.

हाडांसाठी फायदेशीर :

कॅल्शियम भरपूर असल्याने काळे तीळ तुमच्या हाडांसाठीही खूप फायदेशीर आहेत. हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम महत्त्वाचे आहे. ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्या टाळण्यास मदत करते.

हृदय निरोगी ठेवते :

आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केल्यास रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

अँटी एजिंग गुणधर्म :

वृद्धत्वाच्या लक्षणांनी हैराण असाल तर काळे तीळ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. त्यांच्यामध्ये असलेले शक्तिशाली अँटिऑक्सिडंटस् मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास, ऑक्सिडेटिव्ह तणाव टाळण्यास आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करतात.

Back to top button