गडचिरोली: चिचडोह बॅरेजमध्ये बुडून ४ तरुणांचा मृत्यू | पुढारी

गडचिरोली: चिचडोह बॅरेजमध्ये बुडून ४ तरुणांचा मृत्यू

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि. १४)  दुपारी ४ च्या सुमारास घडली.

मोनू त्रिलोक शर्मा (वय २६, रा.गडचिरोली), प्रफुल्ल विठ्ठल येलुरे (वय २०), शुभम रुपचंद लांजेवार (वय २४), महेश मधुकर धोंगडे (वय २०, सर्व रा. चामोर्शी) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी हे तरूण चिचडोह बॅरेजवर गेले होते. पाच जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चार जण बुडाले. एक जण कसाबसा बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक खांडवे आपले सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. परंतु नाव उपलब्ध नसल्याने पोलिसांनी पाण्यात उड्या मारल्या. तासभर शोधमोहीम राबविल्यानंतर पोलिसांनी युवकांच्या साह्याने दोरखंडाचा आधार घेत चार युवकांना बाहेर काढले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा 

Back to top button