चंद्रपूर : बनावट दारू कारखान्यांचे पाळेमुळे शोधून काढा; सुधीर मुनगंटीवारांचे निर्देश | पुढारी

चंद्रपूर : बनावट दारू कारखान्यांचे पाळेमुळे शोधून काढा; सुधीर मुनगंटीवारांचे निर्देश

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने चार दिवसांपूर्वी मूल तालुक्यातील चितेगाव येथील बनावट देशी दारु कारखान्यावर कार्यवाही करून भांडाफोड केला. यानंतर राज्याचे वन, सांस्कृतिक, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बनावट कारखान्याचे पाळेमुळे शोधून त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात तीन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु, अद्याप आरोपींचा शोध लागला नाही. आरोपी पसार झाल्याने चार ते पाच दिवसांचा कालावधी उलटूनही आरोपी पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे आरोपींचा तात्काळ शोध लावून बनावट दारु कारखान्याचे पाळेमुळे शोधून काढण्याचे आदेश राज्याचे वन, सांस्कृतिक, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी असताना महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूरातील दारुबंदी उठवून जिल्हयातील नागरिकांना व्यसनाधीनतेकडे वळविण्याचे पाप करत आहेत, असा आरोप केला आहे. मूल सिंदेवाही राज्य महामार्गावरील चितेंगाव येथे बनावट देशी दारुचा कारखाना तयार करून बनावट दारू तयार केली जात होती. या घटनेची गुप्त माहिती मिळाल्याने चंद्रपूर येथील राज्य उत्पादन विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वात धाड टाकली आणि सुमारे साडे सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात तीन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. परंतु, आरोपी फरारी झाले आहेत. यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला हे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button