भंडारा : चॉकलेटचे आमिष दाखवून चुलत काकाचे बालिकेवर लैंगिक अत्याचार | पुढारी

भंडारा : चॉकलेटचे आमिष दाखवून चुलत काकाचे बालिकेवर लैंगिक अत्याचार

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : भंडारा जिल्ह्यातील एका गावात सहा वर्षीय मुलीवर सोळा वर्षीय चुलत काकाने चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना धक्‍कादायक घटना मंगळवार, २४ जानेवारी राेजी उघडकीस आली. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चुलत काकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्‍याला ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी पहिलीच्या वर्गात शिकते. मंगळवारी शाळेतून घरी आल्यानंतर ती खेळत होती. घराशेजारीच राहणाऱ्या चुलत काकाने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले. घरी बोलावून तिच्‍यावर लैंगिक अत्याचार केला. तिने हा प्रकार घरी सांगितले. तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने आपबिती सांगितली. पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून व वैद्यकीय अहवालावरून चुलत काकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला ताब्यात घेतले.

हेही वाचा : 

Back to top button