चंद्रपूर: अखेर कोंबड्यावर ताव मारणारा बिबट्या पिंजऱ्यात अडकला | पुढारी

चंद्रपूर: अखेर कोंबड्यावर ताव मारणारा बिबट्या पिंजऱ्यात अडकला

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर तालुक्यातील लोहारा गावातील बेघर परिसरात कोंबड्यावर ताव मारणारा बिबट अखेर पिंजऱ्यात अडकला. आज  (दि.१) पहाटे हा बिबट पिंजऱ्यात अडकल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

मागील अनेक दिवसांपासून लोहारा गावातील बेघर वस्तीत बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. गावात येऊन नागरिकांच्या कोंबड्या फस्त करत होता. दरम्यान, गावातील नागरिकांनी या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली होती. त्यानंतर वनविभागाने परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते. दरम्यान, शनिवारी पहाटे हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. याची माहिती गावातील नागरिकांना मिळताच नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती.

हेही वाचा ? 

Back to top button