Swachh Survekshan 2022: सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने पटकावले तिसरे स्थान; पुणे पहिल्या दहातून बाहेर | पुढारी

Swachh Survekshan 2022: सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने पटकावले तिसरे स्थान; पुणे पहिल्या दहातून बाहेर

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारा अंतर्गत  (Swachh Survekshan 2022) देशात स्वच्छ शहाराच्या यादीत नवी मुंबईने तिसरे स्थान पटकावले आहे. तर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराच्या यादीत २०२१ मध्ये आठव्या स्थानावर असणाऱ्या पुणे शहर २०२२ च्या पहिल्या १० शहरांच्या यादीमधून बाहेर पडले आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील स्वच्छ शहरांच्या पहिल्या १० मध्ये महराष्ट्रातील एकमेव नवी मुंबई शहराने स्थान पटकावले आहे. तर नवी मुंबई २०२० साली या यादीत तिसऱ्या स्थानी होते तर २०२१ साली चौथ्या स्थानी होते.

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांतर्गत (Swachh Survekshan 2022) देशातील सर्वात स्वच्छ शहर असणाऱ्या पहिल्या १० शहरांना शनिवारी राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्वच्छ शहरांच्या पहिल्या १० मध्ये नवी मुंबईने तिसरे स्थान पटकावले आहे. मराष्ट्रातील अन्य कोणत्याही शहराला पहिल्या १० मध्ये स्थान मिळवता आले नाही. २०२१ मध्ये पुणे शहर या यादीत आठव्या स्थानी होते.

देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदोर शहराने सलग सहाव्यांदा पहिले क्रमांक पटाकावले आहे. इंदोर हे देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर असल्याचे मानले जाते. याच बरोबर सुरत शहराने सलग तिसऱ्यांदा दुसऱ्या स्थानावर रहाण्याचा मान मिळवला आहे. (Swachh Survekshan 2022)

Swachh Survekshan 2022

यासह १ लाख शहरांच्या विभागात सातारा जिल्ह्यातील पाचगणीने प्रथम क्रमांक तर कराडने तिसरा क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते दोन्ही नगरपालिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Back to top button