Swachh Survekshan 2022 : देशात पाचगणी प्रथम तर कराड तिसऱ्या स्थानी | पुढारी

Swachh Survekshan 2022 : देशात पाचगणी प्रथम तर कराड तिसऱ्या स्थानी

कराड: पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्च सर्वेक्षण २०२२ (Swachh Survekshan 2022) पुरस्कारांचे वितरण राष्टपती द्रोपदी मुर्म यांच्या हस्ते आज पार पडले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पाचगणी आणि कराड या शहरांनी स्वच्छ शहरांच्या यादीत स्थान पटकावले आहे. १ लाख शहरांच्या विभागात पाचगणीने प्रथम क्रमांक तर कराडने तिसरा क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते दोन्ही नगरपालिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

स्वच्छता, सौंदर्यकरणावर दिलेला भर, मुख्याधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी झोकून दिलेले काम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पाचगणी नगरपालिकेने पहिला तर कराड नगरपालिकेने देशात तिसरा क्रमांक पटकावला. दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडला आहे. (Swachh Survekshan 2022)

शहरातील ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेला एसटीपी प्लांट, शहराच्या सौंदर्यकरणासाठी केली जाणारी कलात्मकता, टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर व कचऱ्याचे योग्य नियोजन या बाबी स्पर्धेत महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.

सलग चार वर्षे नगरपरिषद ही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सातत्याने अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, अभियंता आर. डी. भालदार, मिलिंद शिंदे, अभियंता पवार, पालिकेचे वरिष्ठ मुकदम मारुती काटरे आदीसह सर्व कर्मचाऱ्यांनी झोकून काम केल्याने कराडने यंदा देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button