अकोला : अकोटमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; बर्फीचा साठा जप्त करून नष्ट | पुढारी

अकोला : अकोटमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; बर्फीचा साठा जप्त करून नष्ट

अकोला: पुढारी वृत्तसेवा : अन्न व औषध प्रशासन, अकोलाद्वारे अकोट तालुक्यातील मे. न्यु सौराष्ट्र हॉटेल अ‍ॅण्ड कोल्ड्रींक्स, जवाहर रोड, ता. अकोट, जि.अकोला येथे प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री होत असल्याचे माहिती मिळाली.

न्यु सौराष्ट्र हॉटेल अ‍ॅण्ड कोल्ड्रींक्स, ता. अकोट येथे सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी छापा टाकला. यावेळी विक्रेता घनश्याम नारायणदास शर्मा यांचेकडे 28 कीलो 5 हजार 600 रुपये किंमतीचा साठा जप्त केला.

स्पेशल बर्फी अस्वच्छ परिस्थीतीमध्ये साठविलेली होती, तसेच लेबल दोष व भेसळीच्या संशयावरून हा कारवाई केली. तसेच मानवी आरोग्यास अपायकारक असणारे हे खाद्य पदार्थ नष्ट केले. मिठाई विक्रेत्याने दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रे वरती वापरण्यास योग्य असा कालावधीचा दिनांक नमूद केलेला आढळला नाही. जप्त साठा नमुना विश्लेषणाकरीता प्रयोगशाळेत पाठविला असुन विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button