डोंबिवली: तृतीयपंथीयांच्या १० रुपयात गरीब थाळीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ | पुढारी

डोंबिवली: तृतीयपंथीयांच्या १० रुपयात गरीब थाळीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : गोरगरीब गरजूंच्या पोटाची खळगी भरावी म्हणून आता तृतीयपंथीयांनी पुढाकार घेतला आहे. तृतीयपंथीयांच्या ख्याईश फाऊंडेशनच्या माध्यमातून अवघ्या एक रुपयांमध्ये नाश्ता, तर दहा रुपयात गरीब थाळी केंद्राचा शुभारंभ ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर बोलताना म्‍हणाले, तृतीयपंथीयांचा हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यांना रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र देण्याचे काम सुरु आहे. राज्यभरातून ठाणे जिल्ह्यात 782 तृतीय पंथीय मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

ठाणे जिल्हा हा तृतीयपंथीय मतदारांची नोंदणी करण्यात अव्वल ठरला आहे. आधारकार्ड आणि रेशनिंग कार्ड नोंदणीकराता फाऊंडेशनने सहकार्य केल्यास त्याला सरकारी यंत्रणोला जास्त उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर 65 वर्षीय तृतीयपंथीयांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मानधन देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
फाऊंडेशनच्या माध्यमातून 7 तृतीयपंथीय बारावीची आणि 3 जण बी कॉमची परिक्षा देणार आहेत.

किन्नर, गरजू, विधवा आणि आदीवासी निराधारांना आसरा नाही. त्यांच्याकरीता मुरबाड येथे दहा एकर जागा आहे. त्याठिकाणी निवारा उभा करण्याकरीता बांधकाम साहित्याची गरज आहे. ते देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ख्याईशच्या अध्यक्षा तमन्न मन्सुरी यांनी केली असता, मुरबाड येथील ख्याईश फाऊंडेशनच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी दानशूर व्यक्तींकडून मदत मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी यावेळी आश्वासन दिले.

तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा गरीब थाळीचा पथदर्शी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या गरीब थाळी केंद्राच्या माध्यमातून आदीवासी, गरीब गरजू विधवा माहिला आणि तृयीत पंथीय यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या गरीबथाळीचा शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ख्याईश फाऊंडेशनच्या संस्थापकीय अध्यक्षा तमन्ना मन्सूरी, सल्लागार पूनम सिंग, रिपाईचे अण्णा रोकडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा 

जळगाव : राज्यातील २५३ हून अधिक पाणी पुरवठा योजनांचा मार्ग मोकळा ! 

औरंगाबाद: प्रतिष्ठापना केलेल्या ‘त्या’ तीन गणरायांचे विसर्जन नाही 

औरंगाबाद: प्रतिष्ठापना केलेल्या ‘त्या’ तीन गणरायांचे विसर्जन नाही

Back to top button