कोकणात अभूतपूर्व वाहतूक कोंडी, दहा तास अडकले प्रवाशी        | पुढारी

कोकणात अभूतपूर्व वाहतूक कोंडी, दहा तास अडकले प्रवाशी       

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यात हरवलेला रस्ता आणि वाहतूक नियोजनाचा उडालेला बोजवारा यामुळे कोकणात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. महाड ते माणगाव हे 28 किलो मिटरचे अंतर कापण्यासाठी तब्बल साडे चार तास लागले. तर मंडणगड ते माणगाव हे अंतर कापण्यासाठी बसला दहा तासापेक्षा अधिक वेळ लागला. सकाळी साडे आठ वाजता सुटणारी बस माणगावला पावणे सातच्या सुमारास पोहचली. त्यानंतर पेण हे अंतर कापण्यासाठी वाहनांना नऊ वाजले.

या वाहतूक कोंडी मुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आणि प्रवाशांनी रस्ते दुरुस्त आणि पूर्व करण्याची सद्बुद्धी अधिकारी, ठेकेदार आणि राज्य सरकारला देवो, अशी सातत्याने गणराया चरणी प्रार्थना करीत होते. प्रवाशांना खायचे प्यायचे वांदे झाले होते, रस्त्यावरच वाहने उभी असल्याने शौचालयास जाण्याची अडचण निर्माण झाली होती. त्याचा लहान मुलांना, महिलांना अधिक त्रास सहन करावा लागल्याने प्रवाशांनी अधिकारी, राज्य सरकारच्या नावाने आज शिमगा केला.

Back to top button