ज्ञानवापी वादात RSS उतरणार का?; सरसंघसंचालकांनी जाहीर केली भूमिका | पुढारी

ज्ञानवापी वादात RSS उतरणार का?; सरसंघसंचालकांनी जाहीर केली भूमिका

नागपूर : पुढारी ऑनलाईन : ज्ञानवापी मशिद आणि काशी विश्वेश्वर वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी महत्त्वाचे विधान केलेले आहे. “प्रत्येक मशिदीत शिवलिंग कशासाठी शोधले पाहिजे?,” असे विधान त्यांनी केले आहे. तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा प्रश्नांवर नव्याने आंदोलन उभे करण्याच्य बाजूने नाही, असेही ते म्हणाले. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिबिर सुरू आहेत. या शिबिराच्या समारोपात ते बोलत होते. “ज्ञानवापी वादात काही श्रद्धेचे मुद्दे आहेत. पण न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा.”

“सध्या ज्ञानवापीचा वाद सुरू आहे. ज्ञानवापी एक इतिहास आहे आणि तो आता बदलता येणार नाही. आपण इतिहास घडवलेला नाही. आताच्या हिंदू आणि मुस्लिमही या इतिहासाला जबाबदार नाहीत. ते त्या काळात होऊन गेले आहे. इस्लाम भारतात आक्रमकांच्या माध्यमातून आला. या हल्ल्यात मंदिरं तोडली गेली. अशी हजारो मंदिरं आहेत. ज्या मंदिरांबद्दल हिंदूंच्या मनात विशेष अस्था आहे, ते मुद्दे सध्या उचलेले जात आहेत.”

“हिंदूंचा मुस्लिमांना विरोध नाही. भारतातील मुस्लिमांचे पूर्वज हे हिंदूच होते. अनेक हिंदूना असे वाटते की हिंदूंचं नैतिक खच्चीकरण करण्यासाठी ही मंदिरं पाडली गेली होती. आता हिंदूंमधील काही घटकांना ही मंदिरं पुन्हा बांधली जावीत असे वाटते?”

यापुढे आरएसएस मंदिरांसाठी आंदोलने करणार नाही असे त्यांनी जाहीर करत रोज नवीन मुद्दा उकरून काढणं चुकीचं आहे असे मत भागवत यांनी व्यक्त केले आहे.

ज्ञानव्यापीच ठीक पण प्रत्यके मशिदीत शिवलिंग शोधात बसायचं का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. देशात हिंदुत्वाच्या प्रत्येक मुद्यांत आरएसएसची भूमिका महत्वाची असते. या धर्तीवर भागवत यांचा हा संदेश महत्वाचा आहे.

सिंधी संस्कृती टिकावी म्हणून ‘विद्यापीठ’ व्हावे : डॉ. मोहन भागवत

RSS : हिंसाप्रिय समाज अखेरच्या घटका मोजतोय : मोहन भागवत

 

Back to top button