RSS : हिंसाप्रिय समाज अखेरच्या घटका मोजतोय : मोहन भागवत | पुढारी

RSS : हिंसाप्रिय समाज अखेरच्या घटका मोजतोय : मोहन भागवत

अमरावती, पुढारी ऑनलाईन : “हिंसाचारामुळे कोणाचाच फायदा होत नाही. ज्या समाजाला हिंसाचार प्रिय होता तो आता अखेरच्या घटका मोजत आहे. हिंसाचाराने कोणाचे भले होत नाही. आपण कायम अहिंसक आणि शांतीप्रिय असले पाहिजे. आपल्याला प्राधान्याने हे काम करण्याची गरज आहे”, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले आहे.

अमरावतीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, “सरकारच्या नावातच ‘स’ म्हणजेच सकारात्मकता आणि ‘रकार’ म्हणजे सरकार सत्ता असेपर्यंत सरकार राज्य करेल, मात्र समाज एकत्र असेल आणि समाजाचा दबाव असेल तर सरकारला त्या गोष्टी करणे बंधनकारक असतात. मग ते सरकार कोणतेही असो. सरकारला समाजाच्या सोबत राहावे लागते आणि समाज ठरवेल तोपर्यंत सरकार राहू शकते.” (RSS)

“आज सर्व काही झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे आता संपूर्ण समाजाने सुद्धा एकत्र येऊन चांगला विचार करणे गरजेचे आहे. समाजाने वाईट विचार केला तर त्यातून गुंडगिरी निर्माण होऊ शकते, वाईट गोष्टी घडतात म्हणून सर्वांचे मन चांगले बनावे. मी तर सरकारमध्ये जात नाही, एकच गोष्ट सरकारने मला दिली, ती म्हणजे सुरक्षा. बस एवढेच माझ्याजवळ सरकारचे आहे. मी समाजाचा आहे, त्यामुळे मी सरकारमध्ये जात नाही, पण आपण सरकारमध्ये असलो तर चांगलं काम करू शकतो, मला इच्छा नसताना सुरक्षा मिळाली”, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.

पहा व्हिडिओ : राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आत्मे एकत्र आलेत – संजय राऊत यांची टीका

Back to top button