

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : सिंधी संस्कृती टिकून राहावी यासाठी देशात सिंधी विद्यापीठ होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. अमरावती शहरालगत भानखेडा मार्गावर साकारण्यात येत असलेल्या संत कंवरधाम येथे सिंधी समाजाच्या श्रद्धास्थान आहे. या ठिकाणचे प्रमुख संत कंवरराम यांचे पणतू साई राजेशलाल मोरडिया यांचा गद्दीनशिनी सोहळा गुरुवारी (दि. 28) पार पडला.
आपल्या धर्मासोबत जमीनही टिकून राहावी म्हणून काही सिंधी बांधव पाकिस्तानात राहिले आहेत. तर काही बांधव जमिनी गेल्या तरी धर्म टिकून राहावा यासाठी अनेक सिंधी बांधव भारतात परत आले आहेत. आणि भारताच्या विकासात सिंधी समाजाचा अतिशय मोलाचा वाटा आहे. सिंधी संस्कृती आणि भाषा टिकून राहावी, यासाठी देशात सिंधी विद्यापीठ व्हावे, अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे नाही, असे मोहन भागवत म्हणाले.
अखंड भारत व्हावा हे देशातील सर्वांचेच स्वप्न आहे. हे स्वप्न नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असेपर्यंत निश्चितच पूर्ण होईल असा विश्वास आहे. तर माझ्या हयातीत अखंड भारत होणार की नाही मला माहिती नाही, मात्र अखंड भारताची निर्मिती निश्चितपणे होईल असे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती म्हणाले.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून रास्वसंघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, जगद्गुरु शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज, अंजनगाव येथील शक्तिपीठाचे जितेंद्रनाथ महाराज, साई युधीष्ठिर लाल साहेब, साई जशनलाल साहेब, साई मोहनलाल साहेब, सुनील देशपांडे, इंद्रेश, नानक आहुजा, लघाराम नागवानी, पिटर दलवानी, शंकर लालवानी, अशोक रोहानी, विनोद चांदवानी, अशोक कामदार, डॉ. विजय बख्तार, भगवानदास सबलानी, वासुदेव नवलानी, अजय बत्रा, निर्मला वाधवानी यांच्यासह आदी उपस्थित होते. या सोहळ्याला अमरावती शहर आणि जिल्ह्यासह देशातील विविध भागातून सिंधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा