चंद्रपूरचा पारा पुन्हा चढला; ४६.८ तापमान | पुढारी

चंद्रपूरचा पारा पुन्हा चढला; ४६.८ तापमान

चंद्रपूर; (पुढारी वृत्तसेवा) : सध्यस्थितीत चंद्रपूरचा पारा चांगलाच चढला आहे. गेल्या चोवीस तासात वर्ध्यामध्ये ४६.६ अंश सेल्सिअसने नवा रेकार्ड नोंदविला असून रविवार (दि.१५) रोजी सायंकाळच्या सुमारास हवामान खात्याने केलेल्या नोंदीत चंद्रपूरने वर्धेला मागे टाकीत ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे मार्च महिण्यापासून चंद्रपूरचे तापमान हे ४४ अंशाच्या वर आहे.

दिवसरात्र उकाडा ; मालेगावकर घामाघूम, तापमान ‘इतक्या’ अंशांवर

यापूर्वी फक्त महिण्यातून एक दोनदाच तापमान चढलेले असायचे. त्यापाठोपाठ ब्रम्हपूरी शहरातही तापमानात नवनवे विक्रम नोंदवित असून चंद्रपूरचा पाठलाग करीत ब्रम्हपूरी ४५.९ अंशावर पोहचला आहे. या चढत्या तापमानाचा परिणाम मानवी जीवनावर होतो आहे.

कडक उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत असून याचा रोजगारावर परिणाम झालेला आहे. कडक उन्हामुळे नागरिकांचे काम करण्याचे दिवस कमी झाले आहेत. त्यामुळे आर्थीक परिस्थतीवर परिणाम होताना दिसून येत आहे. दिवसभर नागरिक उन्हामुळे घराबाहेर पडणे टाळत आहेत. रस्ते ओस पडूत असून आरोग्याची समस्याही निर्माण होत आहेत.

विदर्भात वर्धा सर्वात हॉट ; ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

याचाच परिणाम शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांवर जाणवू लागला आहे. पिके करपण्याचा धोका आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याचा धोका वाढत्या तापमानाने निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हवामान खात्याने १७ मे पर्यंत उष्णलहरींचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात चंद्रपूर तापमानाचे सारे रेकार्ड मोडण्याचा अंदाज पर्यावरण सोसायटीचे अध्यक्ष तथा खगोल अभ्यास प्रा. सुरेश चोपणे यांनी वर्तविला आहे.

हे वाचलंत का?

Back to top button