Data Leak : लाखो नागरिकांचा डाटा लिक करणाऱ्याला अटक | पुढारी

Data Leak : लाखो नागरिकांचा डाटा लिक करणाऱ्याला अटक

ठाणे : पुढारी डेस्क
ठराविक रकमेच्या मोबदल्यात लाखो नागरिकांची व त्यांच्या कुटुंबियांची वैयक्तिक माहिती लिक (Data Leak) करणारा आरोपी मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. या आरोपीला गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ६ च्या पथकाने अटक केली. आरोपी सुजीत नांगरे (२७, आकुर्डी, पुणे) याला पुण्याहून मुंबईत आणल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली, असून या आरोपींकडून महाराष्ट्र, गुजरात नवी दिल्लीतील नागकिांची माहिती जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात अनेक जण सहभागी असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी दैनिक पुढारीला सांगितले.

मोबाईल नंबर अथवा आपल्यावर किती कर्ज आहे, कोणत्या बँकेत नागरिकांचे खाते आहे यांसह अन्य माहिती कोणालाही शेअर केलेली नसतानाही ऑफर देणाऱ्या कंपन्यांकडे आपला नंबर कसा येतो, हा प्रश्न अनेकांसाठी कायम अनुत्तरीत राहिला आहे. याकडे बारकाईने लक्ष ठेवून असताना गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ६ च्या पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांना खबऱ्याने वैयक्तिक माहिती देणाऱ्यांची माहिती दिली. त्यानुसार युनिट ६ च्या पथकाने कारवाईसाठी सापळा लावला. आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहक नेमला. २ हजारांच्या मोबादल्यात महिन्याभरासाठी पासर्वड, युजर आयडी व अॅपची माहिती आरोपीने दिली. पोलिसांनी माहिती तपासली असता नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर याच्यासह आईवडील, इतर नातेवाईकांची माहिती अॅपमध्ये स्पष्ट निदर्शनास पडली.

पुणे दूरसंचार विभागाने डाटा एन्ट्रीचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. त्याच कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला मुंबई पोलिसांनी संशयित म्हणून अटक आहे.
– मिलिंद राऊत, संचालक, पुणे दूरसंचार विभाग

हेही वाचा

Back to top button