बारामती: गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या संशयावरून केला खून, वडगाव निंबाळकर पोलिसांकडून आरोपीला अटक

बारामती(पुणे), पुढारी वृत्तसेवा: गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या संशयावरून श्रीराम भदुजी गहुकार (वय ४२, रा. अंजगाव बारी, जि. अमरावती) यांचा खून केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी मंगळवारी (दि. १३) रोजी मच्छिंद्र दत्तात्रय काळखैरे (रा. काळखैरेवाडी, ता. बारामती) यांना अटक केली.
या प्रकरणी विशाल श्रीराम गहुकार यांनी फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार २ डिसेंबर रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास सुपे गावच्या हद्दीत हाॅटेल श्रीकृष्ण जवळील वाॅशिंग सेंटरसमोर ही घटना घडली. हाॅटेलच्या गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या संशयावरून काळखैरे यांनी श्रीराम गहुकार यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे अधिक तपास करत आहेत.