डहाणू : शेतकर्‍याचा बुडून मृत्यु | पुढारी

डहाणू : शेतकर्‍याचा बुडून मृत्यु

डहाणू : डहाणू तालुक्यातील चारोटी येथे एका शेतकर्‍याचा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रमेश घोशा असे मयत व्यक्तीचे नाव असून त्यांचे वय 55 वर्ष आहे.

रमेश घोशा हे चारोटी येथील रहिवासी असून ते आपली पारंपरिक शेती जपून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सोमवारी ते आपल्या शेतीत काम करून घरी परतत असताना रस्त्यातील नाल्यामध्ये पाय घसरून पडले असता त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. रमेश घरी आले नसल्यामुळे कुटुंबीयांनी कासा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून शोध कार्य सुरू झाले. मंगळवारी मध्यरात्री 2.30 वा. च्या सुमारास नदीच्या काठावर मिळून आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे नाल्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे घोश्या कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे सरकारकडून आर्थिक मदत मिळावी अशी कुटुंबाला आशा आहे.

Back to top button