डोंबिवलीत सराफ व्यावसायिकावर चाकूहल्ला | पुढारी

डोंबिवलीत सराफ व्यावसायिकावर चाकूहल्ला

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : वेषांतर करून सराफ व्यावसायिकावर भरदिवसा चाकूहल्ला केल्याची घटना मंगळवारी डोंबिवलीत घडली. या घडनेची नोंद राम नगर पोलीस ठण्यात झाली आहे. दरम्यान, शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

डोंबिवली पूर्व येथील आगरकर रोडवर तारकनाथ मन्ना यांचे मन्ना ज्वेलर्स हे दुकान आहे. मंगळवारी बुरखा घालून आलेल्या एका इसमाने तारकनाथ यांच्यावर चाकूने वार केला आणि तेथून फरार झाला. यामध्ये तारकनाथ जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजले नसून याबाबत शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ?

Back to top button