सोलापूर शहराला शनिवारपासून पाच दिवसाआड पाणी पुरवठा | पुढारी

सोलापूर शहराला शनिवारपासून पाच दिवसाआड पाणी पुरवठा

सोलापूर: पुढारी वृत्तसेवा : उजनी – सोलापूर मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण सोलापूर शहराचा पाणी पुरवठा दि.१६ मार्चपासून एक रोटेशनसाठी चार दिवसाआड ऐवजी पाच दिवसाआड करण्यात येणार आहे.

सोलापूर शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी ते सोलापूर मुख्य जलवाहिनीवर विविध ठिकाणी गळती असून ती दुरुस्त करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका पाणी पुरवठा विभागामार्फत १६ मार्चपासून शटडाऊन घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी उजनी पंपहाऊस बंद राहणार असल्याने उजनी – पाकणी येथून सोलापूर शहरास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे यांनी केले आहे.

हेही वाचा 

Back to top button