सोलापूर : टेंभुर्णीत आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह | पुढारी

सोलापूर : टेंभुर्णीत आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : टेंभुर्णीत रविवारी (दि.26) हॉटेल अतिथीजवळ 30-35 वयाच्या एका अज्ञात तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. या तरुणाच्या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने निर्घृणपणे त्याची हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिला. महामार्गावर गस्त घालत असताना टेंभुर्णी पोलिसांना हा मृतदेह आढळून आला.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, टेंभुर्णी पोलीस ठाण्यापासून दोन कि.मी अंतरावरील हॉटेल अतिथीजवळ पडीक मोकळ्या जागेत टेंभुर्णी पोलिसांना एका तरुणांचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी पंचनामा करून तो मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. या तरुणावर धारदार शस्राने हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याच्या संपूर्ण शरीरावर मोठ्या जखमा वैद्यकीय अधिकाऱ्यांना आढळून आल्या आहेत.

दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तरुणांचा मृत्यू झाला असावा तसेच त्यास इतर ठिकाणी हत्या करून मृतदेह येथे आणून टाकला असण्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे. या तरुणांची ओळख अद्याप पटलेली नाही. तरुण तीस ते पस्तीस वर्षाचा असून त्याची उंची 165 ते 175 सें. मी. आहे. तो रंगाने गोरा आहे. त्यास कोरीव दाढी असलेला व त्यास डोक्यावर समोरील बाजूस थोडे टक्कल आहे. या तरुणाने निळ्या रंगाची जीन्स आणि विटकरी रंगाचा फुल शर्ट, ग्रे रंगाचा बनियन परिधान केलेला आहे. त्याच्या उजव्या हातात काळा-पांढरा फ्रेंडशिप ब्रँड धागा आहे. त्याच्या डाव्या हातावर गोंदलेले आहे. या वरील वर्णनाच्या मृत व्यक्तीबद्दल कोणास काही माहिती असल्यास टेंभुर्णी पोलीस ठाण्यास अथवा पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मो.नं. 9834807356 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button