Solapur News : टेंभुर्णी येथे दरवाढीसाठी मनसेने दूध ओतले रस्त्यावर | पुढारी

Solapur News : टेंभुर्णी येथे दरवाढीसाठी मनसेने दूध ओतले रस्त्यावर

टेंभुर्णी: पुढारी वृत्तसेवा : दुधाला दरवाढ व ४० रुपये हमीभाव मिळाला पाहिजे व पशुखाद्याचे दर कमी झाले पाहिजेत, या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे व शहराध्यक्ष समाधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध व घोषणाबाजी करीत आज (दि.५) सकाळी टेंभुर्णी येथील करमाळा चौकात आंदोलन करण्यात आले. दुग्धविकासमंत्र्यांच्या फोटोला गोवऱ्याची माळ घालत घोषणाबाजी करण्यात आली. Solapur News

जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे म्हणाले की, दुधाचे दर कमी झाले आहेत. तर पशुखाद्याचे दर वाढले आहेत. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पशुधन कसे जगवायचे असा पशुपालकांसमोर यक्षप्रश्न आहे. त्यामुळे दुधाला ३.५ फॅट व ८.५ डिग्रीसाठी ४० रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका, असा इशारा गिड्डे यांनी दिला.  Solapur News

यावेळी प्रशांत गिड्डे, समाधान पाटील, तालुकाध्यक्ष सागर लोकरे, सुभाष खटके, सुधीर पाटील, बाळासो टोनपे, अनिल आरडे, आण्णासो शेटे, राहुल सुर्वे, सागर पाटील, अक्षय केचे, कुंदन सुक्रे, संदीप करगळ, सिद्धेश्वर लोंढे, सचिन पाटील, जोतिराम पाटील, महेश पाटील, किशोर पवार, शाहरुख सय्यद, शंकर खांडे, अर्जुन थोरात, संभाजी वाघे, अहिल्या सिन्हा, कुलदीप पाटील, नागेश लोंढे, दिनकर  घोडके, प्रकाश थोरात, गणेश थोरात आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button