Solapur : कुंभारीत घरफोडी; २० तोळे चांदीसह ३० हजार रुपयांची रोकड लंपास | पुढारी

Solapur : कुंभारीत घरफोडी; २० तोळे चांदीसह ३० हजार रुपयांची रोकड लंपास

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पोलीस ठाण्यातच्या हद्दीतील कुंभारीत अज्ञात चोरट्यांनी मोठी घटना घडविली आहे. या घटनेत दहा तोळे सोने 20 तोळे चांदीसह 30 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे.

याची माहिती मिळतात वळसंग पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल सनगल्लेसह पोलीस पथक घटनास्थळी श्वान पथकासह दाखल होत घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहे. कुंभारी येथील सचिन रामचंद्र कटारे शनिवारी रात्री 11 वाजता उन्हाळ्याचे दिवस असल्याने पत्नी व दोन मुली सह जेवण करून कुलूप लावून गच्चीवर झोपावयास गेले. रविवारी पहाटे 5च्या सुमारास उठून खाली आले असता दरवाजाचे कडी कोयंडा कट झाल्याचे दिसल्याने आत जाऊन पाहिले असता घरातील लोखंडी कपाटाचे दरवाजे उचकटलेले दिसले. तत्काळ पत्नी व आईस बोलावून घेऊन बघितले व तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. कपाटातील साहित्य, कपडे ,सोने, चांदीच्या दागिन्यासह कपाटात ठेवलेली 30 हजार रुपये व पॅन्ट च्या खिशातील आधार कार्ड, पॅन कार्ड ,एटीएम कार्ड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या घटनेत 4 लाख97 हजार रुपयाची मालमत्ता चोरीस गेली असल्याची फिर्याद सचिन कटारे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सपोनी अनिल संगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख करीत आहेत.

Back to top button