साेलापूर : मंगेश चिवटे यांना बसवरत्न पुरस्कार प्रदान | पुढारी

साेलापूर : मंगेश चिवटे यांना बसवरत्न पुरस्कार प्रदान

जेऊर : पुढारी वृत्तसेवा :  करमाळ्याचे सुपुत्र तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांना लिंगायत समाजाच्या मार्फत देण्यात येणारा बसवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षापासून राज्यात त्यांच्या माध्यमातून मोठी रुग्णसेवा होत आहे. अशा अनेक पुरस्कारांवर त्यांनी यापूर्वी नाव कोरले आहे.

लिंगायत समाजाच्या वतीने सोलापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव चिवटे हे पोहचू शकले नाहीत. त्यामुळे संबंधित आयोजकांनी सदर पुरस्कार मंत्रालयात जाऊन चिवटे यांना प्रदान केला आहे. पुरस्काराने प्रेरणा मिळते आणि प्रेरणेने विश्व निर्माण होते. असे मत चिवटे यांनी व्यक्त केले. तसेच गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीची गरज असेल तर संपर्क करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी आनंद मुस्तरे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

-हेही वाचा 

कात्रज ते नवलेपूल महामार्गावरील होर्डिंगला खोदाईचा धोका

कोल्‍हापूर : सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट, आजर्‍यात तणावपूर्ण वातावरण

Maharashtra political crisis: राज्‍यपालांना राजकारणाचा भाग होता येत नाही- सुप्रीम कोर्टाचे राज्यपालांवर ताशेरे

Back to top button