धुळे लोकसभा 2024 : उद्या मतदान! केंद्राच्या 100 मीटर परिसरात विशेष निर्बंध लागू – जिल्हादंडाधिकारी अभिनव गोयल | पुढारी

धुळे लोकसभा 2024 : उद्या मतदान! केंद्राच्या 100 मीटर परिसरात विशेष निर्बंध लागू - जिल्हादंडाधिकारी अभिनव गोयल

धुळे : पुढारी वृत्तसेवा –  धुळे लोकसभा मतदार संघाकरीता उद्या सोमवार (दि.) 20 मे  रोजी मतदान होणार आहे. मतदानाचे दिवशी मतदान केंद्राचे 100 मीटर परिसरात फौजदारी विशेष निर्बंधाचे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिनव गोयल यांनी लागू केले आहेत.

जिल्ह्यात शनिवार (दि.१८) रोजी सायंकाळी 6.00 वाजेपासून ते सोमवार (दि.२०) रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर जमाव जमविण्यास व सार्वजनिक प्रचार सभा आयोजनास बंदी असेल. मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारीक ओळखचिठ्ठया साध्या पांढऱ्या कागदावर असाव्यात व त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव मुद्रीत करण्यावर बंदी राहील. मतदान केंद्रात मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी याव्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच प्रवेश राहील. या व्यतिरिक्त इतर व्यक्तींस मतदान केंद्रात प्रवेशावर बंदी असेल.
 ज्या व्यक्तिंच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली असेल. अशी कोणतीही व्यक्ति त्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यासह मतदान केंद्राचे 100 मीटर परीसरात प्रवेश करणार नाही. तसेच अशी व्यक्ती मतदार असली तरी निव्वळ मतदान करण्याकरीता सुरक्षा कर्मचाऱ्यासह मतदान केंद्र परिसरात ये-जा करण्यावर निर्बंध राहील. तथापि, विशेष सुरक्षा व्यवस्था प्रदान केलेल्या व्यक्तिंच्या विशेष सुरक्षा पथकास शस्त्रांसह मतदान केंद्राचे केवळ दारापर्यंत संरक्षित व्यक्तीसोबत जाता येईल व एका वैयक्तिक सुरक्षा अधिका-यास शस्त्राचे प्रदर्शन न करता तसेच मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे अडथळा न करता संरक्षण व्यक्तीस मतदान केंद्रात सोबत करता येईल. मतदान केंद्रात मतदानाचे दिवशी मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस सेट इत्यादी नेण्यास प्रतिबंध राहील. तर मतदान केंद्राध्यक्ष, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था पथक प्रमुख, निवडणूकीच्या कर्तव्यावरील सुरक्षा कर्मचारी यांना प्रतिबंध लागू राहणार नाही.
या बाबींवर निर्बंध नाहीत
ॲम्बुलन्स, दुधगाड्या, पाण्याचे टँकर्स, विद्युत विभाग, पोलीस, निवडणूक कर्मचारी यांच्या वाहनावर बंदी राहणार नाही. विहित मार्गाने जाणाऱ्या प्रवासी बस गाड्यावर बंदी राहणार नाही. टॅक्सी इत्यादी वाहने बस स्टेशन, रेल्वे स्टेशन हॉस्पीटलकडे जाणारी वाहने यावर बंदी राहणार नाही. दिव्यांग, आजारी व्यक्तिंस मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणे येणे करीता आजारी, दिव्यांग व्यक्तिंचे वैयक्तिक वाहनास बंदी असणार नाही. तसेच मतदानाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी, निवडणूक निरिक्षक यांना लागू राहणार नाही असेही जिल्हा दंडाधिकारी गोयल यांनी सांगितले आहे.
हेही वाचा:

Back to top button