सोलापूर : सीईओ पदाचा अतिरिक्त कार्यभार मनिषा आव्हाळे यांचेकडे सुपूर्द | पुढारी

सोलापूर : सीईओ पदाचा अतिरिक्त कार्यभार मनिषा आव्हाळे यांचेकडे सुपूर्द

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सीईओ दिलीप स्वामी यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांचेकडे सुपूर्द केला. त्यानंतर नुतन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी सीईओ स्वामी यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आज झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत सीईओ दिलीप स्वामी यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करून विभाग प्रमुखांची ओळख करून दिली. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, शिक्षणाधिकारी संजय जावीर, प्रकल्प अधिकारी जावेद शेख, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रभारी प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उमेदचे अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, प्रमुख उपस्थित होते. यावेळी उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंखे व सुलभा वठारे यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल स्वागत करण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button