

दोनवडे ; श्रीकांत पाटील : मुलींना वश करण्यासाठी करणी, मुलींच्या फोटोंवर हळदी-कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू अन् हिरवं कापड ठेवल्याचे दोन प्रकार समोर आले आहेत. शाहूंच्या या पुरोगामी करवीर नगरीत असे प्रकार घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
पाडळी खुर्द गावात हा प्रकार समोर आला आहे. येथे एका गुऱ्हाळघराच्या समोर असलेल्या वडाच्या झाडाखाली मुलीच्या फोटोवर हळदी-कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू अन् हिरवं कापड ठेवल्याचं आढळून आलं. असाच प्रकार गावच्या स्मशानभूमीलगतही समोर आला आहे.
या आगोदर पंधरा दिवसांपूर्वी असाच प्रकार पाडळी खुर्द गावात घडला. असा निंदनीय व अघोरी प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अशा गोष्टी करण्यामागे नेमका काय उद्देश आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सध्याच्या आधुनिक युगातही अंधश्रेद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना होत असल्याने समाजात अजुनही अंधश्रद्धा फोफावत असल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा :