सोलापूर : लंम्पी आजारामुळे सांगोला जनावरांचा आठवडा बाजार बंद | पुढारी

सोलापूर : लंम्पी आजारामुळे सांगोला जनावरांचा आठवडा बाजार बंद

सांगोला (सोलापूर) : पुढारी वृत्तसेवा : सांगोला शहरात महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जनावरांचा बाजार भरतो. या बाजारास कर्नाटक, आंध्रप्रदेशसह विविध राज्‍यातून लोक येतात. सध्या लंम्पी आजारामुळे जनावरांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. यामुळे सांगोला येथे भरणारा शनिवार व रविवारचा जनावराचा आठवडा बाजार 10 सप्टेंबर पासून बंद ठेवण्यात येणार आहे, असे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे.

समितीकडून दिलेल्‍या माहितीनुसार, महाराष्ट्रासह इतर राज्यात सांगोल्याचा जनावराचा बाजार प्रसिद्ध आहे. यामुळे या बाजारात मोठ्या प्रमाणात शेतकरी व्यापारी आपली जनावर घेऊन येतात. जनावरांना लंम्पीचा आजार होऊ लागला असून हा आजार संसर्गजन्य असल्याने या बाजारात येणाऱ्या जनावरांना लंम्पी होऊ नये, याची काळजी घेऊन म्हैस, गाय, खिलार, गाय, शेळ्या, मेंढ्यांचा शनिवार व रविवारचा आठवडा बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा  

दिलासादायक बातमी: हिसारमध्ये लम्पी व्हायरसची लस तयार, लवकरच देशभर जनावरांचे लसीकरण

जळगाव : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा काटा काढला

 

Back to top button