सर्वांनी मास्क वापरण्याचे जि. प. सीईओंचे आदेश | पुढारी

सर्वांनी मास्क वापरण्याचे जि. प. सीईओंचे आदेश

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागात मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जि.प.सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली.

सध्या ग्रामीण भागांत कोरोनाचे रुग्ण दोन , तीन आढळून येत आहेत. ही संख्या वाढली तर परिस्थिती नियंत्रणात असावी, यासाठी आतापासूनच उपाय योजना करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात संशयित रुग्णांची कोरोना चाचणी वाढविण्याचेही आदेश आरोग्य विभागास देण्यात आले आहेत.

मास्क वापरणे बंधनकारक नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक ग्रमापंचायतींना देण्यात आले आहेत. गावात ग्रामपंचायतींकडून उपाय योजना व जनजागृती करण्यात यावी अशाही सूचना देण्यात आले आहेत.नियम कडक केला तर लोकांचा विरोध होतो, त्यामुळे सुरुवातीला दक्षतेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्वामी यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स समितीकडून आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी खरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यात पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यात मास्क वापरण्यास सुरुवात करण्यात येत आहे. नियम कडक करुन नागरिकांना त्रास देण्याचा प्रशासनाचा हेतू नाही. मात्र, परिस्थितीनुसार वेळीच दक्षता घेण्यासाठी बैठका व नियोजन करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य खात्याच्या यंत्रणेस सजग राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

पंढरीत होणार आरोग्य चाचणी आषाढी वारीत यंदा सुमारे पंधरा लाख भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे वारीकाळात समाजसेवा करणार्‍या स्वंयसेवकांचे, हॉटेल व्यावसायिकांच्या आरोग्याची चाचणी वारीपूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.

Back to top button