सातारा: सज्जनगडावरील गायमुख मंदिराचा भराव खचला | पुढारी

सातारा: सज्जनगडावरील गायमुख मंदिराचा भराव खचला

परळी: पुढारी वृत्तसेवा: किल्ले सज्जनगडावरील पायरी मार्गावर असणाऱ्या गायमुख मंदिराच्या पायाचा भराव अतिवृष्टीने खचला. यामुळे गायमुख मंदिराला धोका निर्माण झाला आहे.

सज्जनगडावर जात असताना पायरी मार्गावर गायमुख मंदिर लागते. मंदिरासमोरच मारुती मंदिर आहे. दोन्ही मंदिरे समोर आहेत. गडावर वाई येथील चौंडे महाराज वास्तव्यास असताना त्यांनी गोरक्षक संवर्धन तसेच गाईंचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे. या उद्देशाने सज्जनगडावर गाईचे मंदिर उभारले होते. तर त्या समोरील मारुती मंदिर हे श्रीधर स्वामी स्थापित आहे. या दोन्हीही मंदिराला फार जुना इतिहास आहे. गडावरून परळीला जात असताना बरोबर डाव्या बाजूला हे मंदिर आहे. सुरुवातीस सज्जनगडावरून परळीला जाण्यासाठी पायरी मार्गच असायचा. सर्वांना या गोमातेचे दर्शन व्हावे, या उद्देशाने हे मंदिर पायरी मार्गावर उभारले आहे.

सध्या या परिसरात पर्जन्यमान जास्त असल्याने ठिकठिकाणी भराव खचू लागला आहे. तसाच या मंदिराचा पायऱ्यांच्या वरच्या बाजूस असलेला व मंदिराच्या पाठीमागचा भराव मोठ्या प्रमाणात खचल्याने या मंदिराला धोका निर्माण झाला आहे. या मंदिराच्या सभोवतालचा परिसर तत्काळ भरून घेतला. तर मंदिराचे नुकसान थांबणार आहे. या मंदिराच्या संरक्षणासाठी गडावरील दोन्ही संस्था तसेच परळी ग्रामपंचायतीने तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी इतिहास प्रेमींतून आणि भाविकांकडून होत आहे.

हेही वाचा 

Back to top button