सातारा : कराडजवळ उड्डाणपूल पाडण्याची तयारी | पुढारी

सातारा : कराडजवळ उड्डाणपूल पाडण्याची तयारी

कराड; पुढारी वृत्तसेवा :  सातारा ते कागल या पुणे-बंगळूर महामार्गाच्या कामाला गती आली असून कराडजवळ सहापदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाजवळ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेडिंग व वाहनांच्या पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

सहापदरीकरणांतर्गत कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे.  तसेच कराडच्या कोयना नदीवर आणखी एक पूल उभारला जाणार आहे. या पुलापासून ते महामार्गावर मलकापूरच्या पुढे लोटस फर्निचरपर्यंत नवीन उड्डाणपूल बांधला जाणार आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूला भराव असणार आहे. परंतु मध्ये पिलरवर हा पूल उभारला जाणार आहे. काही दिवसांपासून कोयना नदीवर नवीन पुलाच्या व उड्डाणपूल पाडण्याचे नियोजन करण्यात येत आहे

Back to top button